Mon. Jun 5th, 2023

मित्रानो आज आपण पोस्ट ऑफिसच्या एक अश्या योजने विषयी माहिती बघणार आहोत जी तुमच्या बचतीमध्ये भर पाडू शकते. चला तर मग पाहूया पोस्ट ऑफिस ची Gram Suraksha Scheme (ग्राम सुरक्षा योजना) एकदम सगळ्या माहिती सोबत.
पोस्ट ऑफिसच्या तश्या तर अनेक प्रकारच्या योजना सुरू आहेत. जसे कि MIS म्हणजेच मंथली इनकम स्कीम (Monthly Income Scheme). आणि अजूनही बऱ्याच Scheme आहेत पण आज आपण फक्त Gram Suraksha Scheme या विषयी बोलणार आहोत.


Gram Suraksha Scheme । ग्राम सुरक्षा योजना

या योजने मध्ये तुम्ही कमी पैसे गुंतवून चांगला नफा मिळवू शकता. तुमच्यासाठी पैसे जमा करणे आणि चांगला परतावा म्हणजेच रिटर्न मिळावा म्हणून हा एक उत्तम पर्याय आहे.

ग्राम सुरक्षा योजना अशी एक खास योजना आहे ज्यामध्ये तुम्हाला कमीत कमी पैशात चांगला नफा मिळवू शकतो.

पोस्ट ऑफिस ग्राम सुरक्षा योजना असे त्याचे नाव आहे. या योजनेंतर्गत, तुम्हाला दररोज फक्त ५० रुपये म्हणजेच एका महिन्यात १५०० रुपये जमा करावे लागतील. आणि जर तुम्ही ही रक्कम नियमितपणे जमा केल्यास येणाऱ्या काळात तुम्हाला ३० ते ३५ लाखांचा फायदा ही होईल.

आणि सर्वात भारी आणि मजेशीर गोष्ट अशी आहे की, पोस्ट ऑफिस वाले तुम्हाला जीवन विम्याचा लाभ देखील देतात.

आणि इतकेच नव्हे तर ही पॉलिसी खरेदी केल्यानंतर तुम्ही कर्जाचा लाभही घेऊ शकता. फक्त, अट अशी कि पॉलिसी खरेदी केल्याच्या 4 वर्षानंतरच कर्ज घेता येते.


Gram Suraksha Scheme नियम । ग्राम सुरक्षा योजना नियम

किमान प्रवेश वय 19 वर्षे
कमाल प्रवेश वय 45 वर्षे
मॅच्युरिटीवर कमाल वय 55, 58 आणि 60 वर्षे
 • 19 ते 55 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत गुंतवणूक करू शकतो.
 • या योजनेअंतर्गत किमान विमा रक्कम 10,000 ते 10 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
 • या प्लॅनचे प्रीमियम पेमेंट दरमहा, तिमाही, सहा महिने किंवा वार्षिक केले जाऊ शकते.
 • प्रीमियम भरण्यासाठी तुम्हाला 30 दिवसांची सूट मिळते.
 • या योजनेवर तुम्ही कर्ज देखील घेऊ शकता.
 • ही योजना घेतल्यानंतर 3 वर्षांनी तुम्ही ती बंद करू शकता. परंतु या प्रकरणात तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही.

Gram Suraksha Scheme । ग्राम सुरक्षा योजना फायदे

चला आता पाहूया कि तुम्हाला Gram Suraksha Scheme द्वारे फायदा किती होईल, आणि तो कसा होईल.

समजा एखाद्या व्यक्तीने किव्हा तुम्ही तुमच्या वयाच्या 19 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक केली आणि 10 लाख रुपयांची पॉलिसी घेतली, तर त्याचा मासिक प्रीमियम (मासिक हप्ता) 55 वर्षांसाठी 1515 रुपये, 58 वर्षांसाठी 1463 रुपये आणि 60 वर्षांसाठी 1411 रुपये असेल. अशा परिस्थितीत, पॉलिसी खरेदीदाराला म्हणजेच तुम्हाला 55 वर्षांसाठी 31.60 लाख रुपये, 58 वर्षांसाठी 33.40 लाख रुपये आणि 60 वर्षांसाठी 34.60 लाख रुपये मॅच्युरिटी लाभ मिळेल.


Gram Suraksha Scheme । ग्राम सुरक्षा जीवन विमा योजनेचे लाभ

ग्राम सुरक्षा जीवन विमा योजना घेण्याचे खालील फायदे आहेत.

 • ही योजना मृत्यू आणि मॅच्युरिटी म्हणजेच संपल्यानंतर लाभ देते.
 • आयकर कायदा, १९६१ च्या कलम 80C आणि कलम ८८ अंतर्गत कर लाभ देखील उपलब्ध आहेत.
 • विमाधारक म्हणजेच तुम्ही 48 महिन्यांसाठी प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीवर कर्ज देखील घेऊ शकता.
 • तुम्ही पॉलिसी Endowment Assurance मध्ये देखील रूपांतरित करू शकता.
 • ३६ प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी बंद देखील करता येते.
 • या मध्ये उच्च बोनस ऑफर केले जातात.
 • इतकेच नाही तर, पॉलिसी भारताच्या कोणत्याही भागात कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित केली जाऊ शकते.

Gram Suraksha Scheme । ग्राम सुरक्षा जीवन विमा योजनेसाठी पात्रता

 1. केंद्र व राज्य सरकारचे कर्मचारी.
 2. विभागीय प्रतिनिधी
 3. सुरक्षा सेवा
 4. औद्योगिक कर्मचारी
 5. शासकीय अनुदानित शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे
 6. महानगरपालिका
 7. जिल्हा परिषद
 8. नगरपालिका
 9. राष्ट्रीयीकृत बँका
 10. RBI किंवा SBI उपकंपनी
 11. केंद्र व राज्य शासनाचे उपक्रम, मंडळे, महामंडळे, संस्था आणि वित्तीय संस्था.

FAQ:

१) Gram Suraksha Scheme वयोमर्यादा काय आहे?

उत्तर:  १९ वर्षे ते ५५ वर्षे.  

२) Gram Suraksha Scheme बंद करू शकतो का?

उत्तर: ३६ प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसी बंद देखील करता येते.

३) ग्राम सुरक्षा जीवन विमा वर कर्ज काढू शकतो का?

उत्तर: विमाधारक 48 महिन्यांसाठी प्रीमियम भरल्यानंतर पॉलिसीवर कर्ज घेऊ शकतो.

आपण काय बघितले:

मित्रानो आज आपण पोस्ट ऑफिस ची एका अश्या योजने विषयी माहिती बघितली आहे कि ज्यामुळे तुमच्या पैश्यामध्ये आणि बचतीमध्ये भर पडू शकते. आज आपण पोस्ट ऑफिस ची Gram Suraksha Scheme (ग्राम सुरक्षा योजना) या योजने विषयी सगळी पूर्ण पणे  माहिती बघितली आहे. चला तर मित्रानो आजच्या या आर्टिकल मध्ये इतकेच भेटूया पुढच्या एक नवीन विषयावर एक नवीन दिवशी.